आमचे मिशन ​

नगरसेवक हा लोकशाहीतील सर्वात शेवटचा घटक आहे शासनाच्या सर्व योजना नागरिकापर्यंत पोचवणे आणि नागरिकांची काळजी घेणे हे नगरसेवकाचे प्रथम कर्तव्य आहे परंतु याच नगरसेवकाला जनता व शासकीय अधिकारी यांच्यामध्ये दुवा म्हणून काम करत असताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते या अडचणी आर्थिक तरतुदी पासून शासकीय नियमावलीतील त्रुटी पर्यंत आहेत या व यासारख्या अनेक गोष्टी शासनापुढे एकत्रितपणे मांडण्याकरिता आमची संघटना राज्यपातळीवर काम करत आहे संघटनेमधील सर्व पदाधिकारी व सदस्य हे आजी माजी नगरसेवक नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष स्वीकृत सदस्य व तज्ञ मार्गदर्शक या भूमिकेमध्ये आहेत संघटनेची ची वाटचाल चांगल्यारितीने होण्याकरिता समाजातील नामवंत कर्तृत्ववान व्यक्ती या संघटनेच्या सल्लागार पदी मार्गदर्शक पदी व पदाधिकारी म्हणून स्वखुशीने काम करण्यास तयार आहेत नगरसेवक परिषद मुंबई महाराष्ट्र ही संघटना संपूर्णपणे पक्षविरहित पणे काम करत आहे संघटनेमध्ये सर्व पक्षाचे पदाधिकारी सामील झालेले आहेत भविष्यामध्ये हे शहरातील नागरिकांचे विविध प्रश्न सोडविण्याकरिता आणि राज्यातील सर्व नगरसेवकांच्या विचारांची देवाण-घेवाण होण्याकरिता ही संघटना काम करत आहे